Mumbai : मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी परदेशी मशीन, अजस्त्र मशिनीद्वारे मिठीचा गाळ काढणार :ABP Majha
मुंबईला 26 जुलै 2005 च्या महापुरात बुडवणाऱ्या मिठी नदीच्या शुद्धीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महापालिकेनं मंजूर केलाय. मिठी नदी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मिठीच्या प्रवाहात जाणारे मलजल रोखून नदीतील प्रदूषण रोखलं जाणार आहे. कुर्ला येथे नदीत जाणारे दोन नाल्यांमधील मलजल भूमिगत 6 किमी लांबीच्या भुयारातून धारावीतील प्रक्रिया केंद्रात आणले जाणार आहे. मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी परदेशी मशीनचा वापर करण्यात येत आहे. अजस्त्र मशिनीद्वारे मिठीचा गाळ काढण्यात येणार आहे.