Parambir Singh यांच्या सांगण्यावरूनच Sachin Waze वसुली करायचा : बिमल अग्रवाल

Continues below advertisement

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखी एक वसुलीचा गुन्हा नोंद झालाय. बिमल अग्रवाल या व्यापाऱ्यानं 9 लाखांच्या वसुलीचा आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. या गुन्ह्यात परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा नोंद झालाय. जानेवारी 2020 ते मार्च 2021 या काळात सर्व आरोपींनी आपल्याकडून 9 लाख वसूल केल्याचा आरोप तक्रारदार बिमल अग्रवाल यांनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram