Mumbai : काळ्या यादीत असलेल्या कंपनीकडून एमआयडीसीची परीक्षा? ABP Majha
एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.) 865 पदांसाठी 20 ऑगस्ट पासून सुरू आहे. मात्र ही परीक्षा दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या मेसर्स अॅपटेक लिमिटेड कंपनीकडून घेतली जात असल्याची बाब उघड झाली आहे. राज्यातील विविध विभागांच्या सरळसेवा भरतीअंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या खासगी कंपन्यांकडून घेतल्या जाताय. महाआयटीने त्यासाठी 4 कंपन्यांची निवड 23 जानेवारी 2021 ला शासन निर्णय काढून केली होती.