Mumbai Metro | नवीन भुयारी मार्गिकेचा प्रस्ताव, Metro 3 च्या कामाला वेग!

Continues below advertisement
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (MMRCL) आणिक आगार ते Gateway of India प्रवासासाठी मुंबईतला दुसरा भुयारी मेट्रो मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. Metro 11 नावानं या मार्गिकेसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे. ही भुयारी मेट्रो सतरा पूर्णांक एक्कावन्न किलोमीटर लांबीची असेल. या मेट्रो मार्गिकेमुळे शीव, वडाळा, शिवडी, भायखळा आणि भेंडी बाजार सारखे परिसर जोडले जातील. दरम्यान, MMRCL कडे असलेल्या Metro 3 म्हणजे Aqua Line मार्गिकेचं येत्या काही महिन्यात काम पूर्ण होईल. या मार्गिकेचा Worli Naka ते Cuffe Parade हा तिसरा टप्पा लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola