Devendra Fadnavis Offer Uddhav Thackeray: विधान परिषदेत फडणवीसांची ठाकरेंना 'ऑफर', युतीचा स्कोप Special Report
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक राजकीय 'ऑफर' दिली. "एकोणतीस मध्ये तुम्हाला इकडे यायचा स्कोप? तर विचार करता येईल," असे फडणवीस म्हणाले. या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात गंभीर चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित असतानाही फडणवीसांनी ही ऑफर दिल्याने शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी ही ऑफर खेळीमेळीत घेतल्याचे म्हटले असले तरी, त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी यावर वेगळा अर्थ काढत शिंदे गटाला टोला लगावला आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीगाठी यापूर्वीही झाल्या आहेत, मात्र आजची ऑफर आणि त्यानंतरचे नाट्यमय फोटोसेशन चर्चेचा विषय ठरले आहे. पावसाळी अधिवेशनाचा हा दिवस लोकांच्या प्रश्नांऐवजी या राजकीय नाट्याने गाजला.