Mumbai Metro | मुंबई मेट्रोमध्ये सोशल डिस्टन्सिंगची तयारी सुरू; अधिकृत ट्विटवर फोटो शेअर | ABP Majha
लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारची जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरचं मेट्रो सुरू करण्यासाठी मुंबई मेट्रोकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. आता मेट्रोने प्रवास करण्यासाठी कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. मुंबई मेट्रोने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. यापुढे मेट्रोमध्ये अजिबात गर्दी दिसणार नाही. सोबतचं आसन व्यवस्था देखली सोशल डिस्टन्स पाळून तयार करण्यात येत आहे.