Mumbai Metro 2A and 7 : मुंबई मेट्रो २-अ आणि ७ च्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ
Mumbai Metro 2A and 7 : मुंबई मेट्रो २-अ आणि ७ च्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ
‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर सोमवारपासून आठ अधिक फेऱ्या, प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे ‘एमएमएमओसीएल’चा निर्णय ‘दहिसर'- अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवार, २४ एप्रिलपासून या दोन्ही मार्गिकांवरील गाडय़ांच्या आठ फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे ‘एमएमएमओसीएल’ने जाहीर केले आहे.