Mumbai Megablock : मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक, ठाणे-कुर्ला स्टेशनवर काय स्थिती? ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Local Jumbo Mega Block Updates: मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे (Thane Railway Station) आणि सीएसएमटी स्थानकांवर (CSMT Railway Station) एकाच वेळी महामेगाब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगाब्लॉक असेल, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा 36 तासांचा मेगाब्लॉक असेल. या दोन्ही मेगाब्लॉकमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिनही दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण 956 लोकल रद्द केल्या जाणार आहेत, तर या तीन दिवसांत एकूण 72 लांब पल्यांच्या गाड्या देखील रद्द असतील. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. मुंबईत बेस्ट तर ठाण्यात टीएमटी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

काल रात्रीपासून ठाण्यात 63 तासांचा मेगाब्लॉक सुरू झाला असून रविवारी दुपारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इथं पर्यायी सुविधा म्हणून अरिक्त बसेसची सुविधा करण्यात आली आहे.

पुढचे तीन दिवस चाकरमान्यांसाठी जिकरीचे 

पुढचे तीन दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठे जिकरीचे असणार आहेत. कारण आज शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून मध्य रेल्वेवरील महाजम्बो मेगाब्लॉकला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येनं स्त्री, पुरुष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून विविध यंत्रणांसोबत कामाला सुरुवात झाली आहे. तब्बल 63 तासांचा हा मेगाब्लॉक असून रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram