Mumbai Water Crisis : मुंबईत पाणीबाणी! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8% पाणीसाठा

Continues below advertisement

मुंबई : मुंबईकरांना, पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. जुलै महिना अखेरपर्यंत मुंबईला पाणीसाठी, पुरेल अशा रीतीने नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईकरांना काळजी करण्याचे कारण नाही, पण, पाण्याचा वापर सर्वांनी काटकसरीने करणे आवश्यक असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मागच्या वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. असं असलं तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणीसाठा पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन पालिकेनं केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करु नये.

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा 

दरम्यान, सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचं आहे, असं आवाहन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलं आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील सध्या उपलब्ध पाणीसाठा आणि नियोजन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram