Mahul Land Issue | माहूलच्या भूसंपादनावर भूमाफियांचा डोळा, भराव टाकून कांदळवनं नष्ट करण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
मुंबईतल्या चेंबूरनजिकच्या माहुल गावाला आधीच वायुप्रदूषणाचा विळखा पडला आहे. त्यात आता या गावाच्या भूसंपदेवरही भूमाफियांचा डोळा आहे. इथली कांदळवन आणि मोकळ्या भूखंडांवर मातीचा ढिगारा आणि कचरा टाकून पर्यावरणाची मोठी हानी करण्यात येत आहे. पण प्रशासन अजूनही ढिम्म आहे. माहुल कोळीवाड्याच्या किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवनं आहेत. तसंच इथे अनेक मोकळे शासकीय भूखंडही आहेत. पण काही समाजकंटक त्यावर भराव टाकून ही कांदळवनं नष्ट करीत आहेत. शासनाच्या आरक्षित भूखंडांचं तर अनधिकृत डंपिंग ग्राऊंड करण्यात येत आहे. याबाबत माहुलच्या कोळी बांधवांनी अनेकवेळा तक्रार करुनही प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Continues below advertisement