Lower Parel : डिलाईल पुलाचे आज मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन, आदित्य ठाकरेंना निमंत्रण
लोअर परळ येथील डिलाईल पुलाचे आज मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर सोबतच सरकत्या जिन्याचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची या समारंभास प्रमुख उपस्थिती असणार आहे..तर ठाकरे गटाच्या अरविंद सावंत, आदित्य ठाकरे यांनाही उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय. .या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.