Mumbai Lockdown : रुग्णसंख्या वाढल्यास लॅाकडाऊन अटळ : Kishori Pednekar

राज्यात कोरोनाचं संकट अजूनही कमी झालेले नाही. डेल्टा प्लस रुग्णांची संख्या सुद्धा हळूहळू वाढताना दिसत आहे. दरम्यान, राज्य सरकारने कोरोना निर्बंध लादून अनलाॅक प्रक्रिया सुद्धा सुरू केली, मात्र तरीसुद्धा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आ वासून बसले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सर्वांनी काळजी घेणं म्हत्त्वाचं असा सल्ला त्यांनी दिला, शिवाय रुग्णसंख्या वाढल्यास लाॅकडाऊन अटळ असल्याचा इशारा सुद्धा पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola