मुंबई गट 2 मध्ये आल्यानंतरच मुंबई लोकलचा विचार, महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची माहिती

आज राज्यातील जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि व्याप्त खाटांची संख्या याची आठवड्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईचा पोजिटीव्हीटी रेट घसरला असला तरी आणखी काही दिवस परिस्थिती नियंत्रणात येण्याचे प्रयत्न करून पुढील आठवड्यात मुंबईला लेव्हल 2 मध्ये आणण्यासाठी विचार केला जाईल, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी 'एबीपी माझा' ला माहिती दिली आहे. पोजिटीव्ही रेट हा पुढील आठवड्यात 2 ते 2.5 पर्यत किंवा त्यापेक्षा कमी झाला तर नक्कीच मुंबई लेव्हल 2 मध्ये आणण्याचा विचार करून आणखी नियमांमध्ये शिथीतला आणली जाईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola