..तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा इशारा
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि येत्या 26 जून रोजी महाराष्ट्रात 1 हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार अशी घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. या बैठकीला चंद्रशेखर बावानकुळे, गिरीश महाजन, संजय कुटे, चित्रा वाघ, मनीषा चौधरी यांच्यासह भाजपचे ओबीसी नेते उपस्थित होते.
Tags :
Devendra Fadnavis Uddhav Thackeray Pankaja Munde Vijay Wadettiwar Chandrashekhar Bawankule Obc Reservation