Mumbai Local Train : लोकांच्या मूलभूत गरजांचं काय? हायकोर्टाचा राज्य सरकारला प्रश्न ABP Majha
लससक्तीचा निर्णय मागे घेण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिलाय. लोकल प्रवास,मॉल्स, थिएटर, नाट्यगृह, पर्यटन स्थळ या ठिकाणी लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत लोकांच्या मुलभूत अधिकारांचं काय असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे.