Mumbai Local Train Ticket soon available on Mobile : मुंबईत लोकलचं तिकीट लवकरच मोबाईलवर मिळणार

मुंबईत लोकलचं तिकीट लवकरच मोबाईलवर मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि राज्य सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. मोबाईल अॅपवर युनिव्हर्सल पास सिस्टीम, अनारक्षित तिकीट यंत्रणेशी जोडण्यासाठी काम सुरू आहे.  त्यानंतर प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध होईल आणि ते मोबाईलवरच लोकलचं तिकीट काढू शकतील. सरकारनं दोन डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. अशा प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola