Mumbai Local Train: लोकलच्या मोटरमनला सावध करण्यासाठी नवी यंत्रणा; मुंबईकरांचा प्रवास होणार सुरक्षित

Continues below advertisement

Mumbai Local Train: लोकलच्या मोटरमनला सावध करण्यासाठी नवी यंत्रणा; मुंबईकरांचा प्रवास होणार सुरक्षित लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेनं मोटरमनच्या केबिनमध्ये ऑडिओ अलर्ट यंत्रणा बसवण्यास सुरूवात केली आहे. पिवळ्या सिग्नलनंतर जर पुढचा सिग्नल लाल असेल, तर तशी सूचना मोटरमनला ऑडिओ अलर्टद्वारे देखील मिळणार आहे. यामुळे सिग्नलकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार टळणार आहेत. मध्य रेल्वेच्या एकूण १५१ लोकलपैकी ९० लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित ६१ लोकलमध्ये मार्च २०२४ पर्यंत ही ऑडिओ अलर्ट यंत्रणा बसवण्यात येईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram