Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये आजपसून मोफत WIFI, मोबाईल अॅपची सुविधा ABP Majha
मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवासात आजपासून मोफत करमणूक उपलब्ध होणार आहे. तूर्तास मध्य रेल्वेच्या १६५ पैकी १० लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आलीय. त्यासाठी लोकलमध्ये कंटेंट ऑन डिमांड अंतर्गत वायफाय आणि मोबाईल अॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या वायफायद्वारे अॅप डाऊनलोड करून त्यातील करमणुकीचे विविध कार्यक्रम प्रवाशांना पाहता येतील.