Mumbai Local Megablock : मेगाब्लॉकचा रेल्वेवर परिणाम, टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट

Continues below advertisement

CSMT Thane Mumbai Local Mega Block Updates: मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे (Thane) येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या महामेगाब्लॉक (Mega Block) मध्य रेल्वेवरील (Central Railway) प्रवाशांचे हाल सुरू असतानाच आज, शनिवारी त्यात आणखी भर पडणार आहे. लोकलच्या तब्बल 534 फेऱ्या रद्द होणार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

आज सर्वाधिक लोकल रद्द आहेत, तर परेल आणि भायखळा पर्यंतच मध्य रेल्वे धावत आहे, त्यामुळे 20 ते 25 मिनिटांच्या फरकाने लोकल ठाणे स्थानकात येत आहेत, यामुळे प्रवाश्यांना त्रास होताना दिसत आहे, मध्य रेल्वेने सांगून ऑफिस सुट्टी देत नाही, त्यामुळे कामाला जावेच लागते, एक आठवडा आधी का नाही सांगितला हा ब्लॉक, अश्या प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 10 आणि11 च्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून (Central Railway) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये 930 लोकल फेऱ्यांसह 72 मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram