Ambivli railway station | आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ वाळूच्या डंपरची गेटला धडक | ABP Majha

मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची दिवसाची सुरुवात खोळंब्याने झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ एका वाळूच्या डंपरने गेटला धडक दिल्याने अपघात झाला. बिघाड दुरुस्त झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला असला तरी, वाहतूक मात्र अद्याप उशिराने सुरु आहे. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola