Khadse- Mahajan | जळगावात झेडपी निवडणुकीनिमित्त खडसे-महाजनांची भेट, पाहा दोघे काय म्हणाले? | ABP Majha
माझं राजकारण फडणवीस-महाजन संपवत असल्याचा आरोप करणारे एकनाथ खडसे आज महाजनांसोबत बैठकीला दिसून आलेत.
जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची उद्या निवडणूक होणार आहे. त्यानिमित्तानं भाजप कार्यालयात आज महाजन आणि खडसे बाजूबाजूला बसले होते. आजपर्यंत विविध व्यासपीठांवर आपली नाराजी उघडपणे मांडणाऱ्या एकनाथ खडसेंनी कुणाचही नाव मात्र घेतलं नव्हतं. पण एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळं आपलं तिकीट कापल्याचा थेट आरोप केलाय. स्वत:च्या राजकारणासाठी फडणवीस आणि महाजन यांनी आपल्याला तिकीट मिळू दिलं नाही, असा गौप्यस्फोट खडसेंनी केलाय