Mumbai Local : लोकल प्रवासासाठी आता मासिक पासबरोबर तिकीटही मिळणार ABP Majha

Continues below advertisement

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी.... मुंबई आणि एमएमआरचे रहिवाशी गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते, तो निर्णय अखेर राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेऊन १५ दिवस झालेल्यांना आता एक दिवसाच्या तिकिटावर लोकल प्रवास करता येणार आहे. दोन डोस घेऊन पंधरा दिवस झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा राज्य सरकारनं दिली... मात्र तिकीट काऊंटरवर फक्त मासिक पासच देण्यात येत होते. मात्र आता एक दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट देखील उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पाठवलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. कोरोनाचे दोन डोस घेऊन देखील अनेकांना तिकिटाअभावी लोकल प्रवासाला मुकावं लागत होतं. मात्र आता तिकीट मिळणार असल्यानं अनेक मुंबईकरांचा लोकलप्रवा पूर्वीप्रमाणे सुरु होणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram