Mumbai Lalbaug Fire : लालबागमध्ये इमारतीला भीषण आग, अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Lalbaug Fire : मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. भीषण आगी जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याचीही माहिती मिळत आहे. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली आहे.
वन अविघ्न मुंबईतील लालबाग परिसारातील गगनचुंबी इमारत. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. लेव्हल तीनचा कॉल आगीचं स्वरुप भीषण असताना दिला जातो. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.