Mumbai Kurla Fire: कुर्ल्यात 30 ते 35 दुचाकी जळून खाक, सिगरेचं थोटुक आगीसाठी कारणीभूत असल्याचा संशय
कुर्ला परिसरातल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत, 30 ते 35 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या आगीचे लोट इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, कुणीतरी जळती सिगारेट फेकल्यानं आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. तर काही रहिवाशांनी आगीसाठी इमारतीखाली उभारण्यात आलेल्या मंडपाला कारणीभूत धरलंय. तूर्तास अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. आणि नेमकी आग कशामुळं लागली याचा शोध सुरु आहे.