Mumbai Fire मुंबई दादरमधल्या कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमधील आगीवर नियंत्रण,16 ते 17 गाड्या जळून खाक

Continues below advertisement

Kohinoor Square Fire: मुंबईत दादरमधल्या कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमधील आगीवर नियंत्रण ; 17 ते 18 गाड्या जळून खाक, आगीवर नियंत्रण
Mumbai Fire Updates: मुंबईच्या (Mumbai News) दादरमधील (Dadar) कोहिनूर स्क्वेअर इमारतीमध्ये (Kohinoor Square) मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipality) पार्किंगमध्ये (Parking Lot) मध्यरात्री मोठी आग लागली. चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाचे 10 ते 12 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले आहेत. सध्या फायर कूलिंगचं काम सुरु आहे. सुदैवानं या आगीमध्ये कुठल्याही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. कंत्राटदाराकडून नियमांचं उल्लंघन करुन गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram