Mumbai Stunt Man Arrested | मुंबईत 23व्या मजल्यावर स्टंट करणाऱ्या कांदिवलीच्या तरूणाला बेड्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी मुंबईतील एका इमारतीच्या 23व्या मजल्यावर स्टंट करणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या तरूणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या तरूणाचा स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचं समोर आलं होतं. मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली होती.
मुंबई पोलिसांनी तपास सुरु करताच हा व्हिडीओ कांदिवलीतील एका तरूणाने शूट केल्याचं निष्पन्न झालं होतं. कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर या तरूणाची ओळख पटली असून याचं नाव नोमाण डिसूजा आहे. गुरूवारी रात्री पोलिसांनी या तरूणाला अटक केली. हा तरूण सध्या शिकत असून त्याला स्टंट करण्याची आवड आहे. तसेच आपल्या मित्रांसोबत हा तरूण जीवघेणे स्टंट करत असतो, असी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. तसेच या तरूणाच्या इतरही मित्रांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.