Ujani Dam | उजनी धरणातील विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती, उजनीतून 1 लाख 20 हजार क्युसेकने विसर्ग
Continues below advertisement
पुणे,सोलापूर, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यात वरदायी ठरलेल्या उजनी धरणातून सध्या भीमा नदीच्या पात्रात एक लाख वीस हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे, मागील दोन दिवसापूर्वी परतीच्या पावसामुळे जो ढगफुटी सदृश पाऊस झाला,त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती ,त्यामुळे उजनीतून अचानक पाणी सोडण्यास सुरुवात झाली यामध्ये 16 ऑक्टोंबर ला तब्बल अडीच लाख क्यूसेक्स पाणी हे सोडण्यात येत होते, मात्र सध्या उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असल्याने उजनीच्या सोळा दरवाजातून एक लाख वीस हजार क्यूसेक्स ने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे, याचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी राहुल ढवळे यांने...
Continues below advertisement