Mumbai JVLR Traffic : जेव्हिएलआरवर वाहतुकीचा खोळंबा ABP Majha

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी... मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झालाय. पवईहून जोगेश्वरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीए. रिलायन्स एनर्जीजवळ मेट्रोचं काम सुरु असणाऱ्या बांधकामाला ट्रकची धडक बसलीए. त्यामुळे जोगेश्वरीहून पवईकडे येणारी बाजू वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आली आहे. पर्यायी वाहतूक विरुद्ध दिशेनं वळवल्यानं पवईहून जोगेश्वरीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतुकीचा खोळंबा झालाय. वाहनांच्या एल अँड टी फ्लायओव्हरपर्यंत रांगा लागल्यात. दुसरीकडे सारीपूतनगरपर्यंत वाहतूक खोळंबली.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola