Navi Mumbai : कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये : Abp Majha

Continues below advertisement

यंदा हापूस आंब्याची चव खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे. कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा आंबा बाजारात आणला. या हंगामातील 25 डझन आंबे बाजार समितीमध्ये दाखल झालेत. एक डझन हापूसला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळालाय.  या वर्षी आलेल्या अवकाळी पावसामुळं आंब्यांचं नुकसान झालं असून, औषधांसाठी मोठा खर्च येत आहे. त्यामुळं आंबा लागवडीत मोठा फायदा होत नसल्याची खंत आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram