Sanjay Raut | राहुल गांधींसोबत जे झालं ते म्हणजे लोकशाहीवर सामूहिक बलात्कार : संजय राऊत 

मुंबई : राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं संजय राऊत म्हणाले.

राऊत यांनी काल म्हटलं होतं की, मी ती दृश्यं पाहिली, ते थांबवता आलं असतं. मात्र ज्या पद्धतीनं राहुल गांधींसोबत धक्काबुक्की केली गेली, ते ठीक नव्हतं, असं संजय राऊतांनी म्हटलं. हाथरसमध्ये पीडितेवर रेपनंतर हत्या केली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कार देखील परिवाराला करु दिले नाहीत. जर तुम्ही पीडितेचा आवाज ऐकू शकत नाहीत, पीडित परिवाराचा आवाज दाबताय तर तुम्हाला 'बेटी बचाओ' ची घोषणा करण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.

हाथरस बलात्कार प्रकरणी शिवसेना रस्त्यावर 

हाथरस बलात्कार प्रकरणी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. आज चर्चगेट स्टेशनसमोर निदर्शने करणार आहे. या आंदोलनात शिवसेनेने अनेक बडे नेते सामील होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर भाजपकडून सुशांतसिंह प्रकरणात आरोप होत आहेत. कंगनाविरुद्ध सेना असा वाद देखील रंगला होता. आज शिवसेना भाजपविरोधात रस्त्यावर उतरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola