Mumbai Sero Survey : झोपडपट्टी परिसरातील कोरोना संसर्गात काहीशी घट, बिगर झोपडपट्टी क्षेत्रात वाढ
Continues below advertisement
मुंबईतील कोविड प्रादुर्भावासंदर्भातील सेरो सर्वेक्षणाचा दुसऱ्या फेरीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. पहिल्या फेरीच्या तुलनेत झोपडपट्टीतील अॅन्टिबॉडीजची पातळी घसरली तर बिगर झोपडपट्टी भागांतील अॅन्टिबॉडीज प्राबल्यात किंचीत वाढ झाली आहे. पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीत झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट तर, बिगर झोपडपट्टी क्षेत्रातील संसर्गात वाढ झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आहे. मात्र, दुसऱ्या फेरीतही इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात अॅन्टीबॉडीजचे प्रमाण अधिकच असल्याचे निदर्शनास आले आहे.
Continues below advertisement