Omicron Variant Cases in India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुंबई मात्र सुरक्षित, महापौरांची माहिती

Continues below advertisement

मुंबई : मागील दोन वर्षभरापासून कोरोना महामारीने (coronavirus) संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. भारतातही या महामारीने धुमाकूळ घातला असताना मागील काहील दिवसांपासून हे संकट कमी होत आहे, असं वाटत होतं. पण त्यातच ओमायक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हेरियंटने आता शिरकाव केल्याने सर्वांची काळजी पुन्हा वाढली आहे. भारतातही नुकतंच या व्हेरियंटने शिरकाव केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेद्वारे दिली. महाराष्ट्राचं शेजारचं राज्य कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परीषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी मुंबईत अद्यापपर्यंत एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram