Devendra Fadnavis on Shivena : भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध, इतरांचं स्वागत? शिवसेनेची दुटप्पी भुमीका :
ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आघाडीत संशयकल्लोळ सुरू झाला असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज आघाडीवर निशाणा साधला. ममतादीदी आणि शरद पवार यांना काँग्रेसला दूर ठेवायचं आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला. ममतादीदी थेट बोलतात आणि पवार सूचक बोलतात, अशा शब्दांत त्यांनी या वादावर भाष्य केलं.