Human Finger Found in Icecream : ऑनलाईन मागवलेल्या आईसस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा Mumbai

Continues below advertisement

Human Finger Found in Icecream :  मुंबईत मुंबईतील मालाड (Mumbai Malad News) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईस्क्रीमच्या (Ice Cream) कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. मलाड पोलिसांनी (Malad Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (mumbai women order online ice cream found human finger maharashtra police sent to fsl)

मलाडमधील एका महिलेने यम्मो कंपनीचं (EMOI) आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते. पण तिने ते खायला सुरुवात करताच तिच्या समोर मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram