Mumbai Corona Hot Spot | मुंबईच्या हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्ण संख्या वाढीचा दर मंदावला

देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. असे असले तरी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शहरातील हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट मंदावला आहे. मुंबईच्या 11 हॉटस्पॉटमध्ये क्षेत्रात 1500 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. यात धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थ वॉर्ड मुंबईत कोरोना रुग्णसंख्येच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक आहे. तर गेले काही दिवस प्रथम क्रमांकावर असलेला वरळीचा समावेश असलेला जी साऊथ वॉर्ड 7 व्या क्रमांकावर गेला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola