ABP News

Mumbai Rains : मुंबईत कोसळधारा, पाणी भरल्यानं मालाड सब वे वाहतुकीसाठी बंद

Continues below advertisement

Mumbai Rains : मुंबईत कोसळधारा, पाणी भरल्यानं मालाड सब वे वाहतुकीसाठी बंद 
मुंबई : पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे  अंधेरी सबवे खाली  चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे
ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईतही जोरदार पाऊस, ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात पाणी साचलं, तर अंधेरी सबवेसह मालाड सबवे पाण्याखाली
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी,  जोगेश्वरीमधील सीआरपीएफ कँम्प दरम्यान पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. 
 राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारने लागू केलेली लाडका बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आम्ही तरुणांसाठीदेखील लाडका भाऊ योजना आणली आहे, असा दावा केला जातोय. दुसरीकडे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागासाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे यासारख्या भागात पावसाने जोर धरला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram