Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती

Continues below advertisement

Mumbai Rain Update : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई : शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका लोकल ट्रेनला बसला असून भांडुप ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्या या काही वेळआपासून बंद आहेत. तशा प्रकारची घोषणा दादर स्टेशनवर करण्यात आली आहे. पावसामुळे घाटकोपर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय.

मुंबईत आज दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकल सेवेवर झाल्याचं दिसलं.मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहे तर पश्चिम रेल्वे 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे. विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.  

घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. गेल्या तासाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram