Mumbai : सीटबेल्ट संदर्भात फक्त समज दिली जाणार, 11 नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई

Continues below advertisement

मुंबईकराच्या सुरक्षित प्रवासासाठी चारचाकी वाहनाच्या मागच्या आसनावरही आजपासून सीटबेल्टची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं एकप्रकारे चारचाकी वाहनातून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणं बंधनकारक झालं आहे. पण या नियमाचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना पुढचे दहा दिवस तरी कोणताही दंड ठोठावण्यात येणार नाही. त्याऐवजी जनजागृती म्हणून वाहतूक पोलिसांकडून त्या प्रवाशांना केवळ समज देऊन सोडून देण्यात येणार आहे. येत्या ११ नोव्हेंबरपासून मात्र सीटबेल्ट सक्तीसाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबईच्या वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनचालकासह कोणत्याही सहप्रवाशानं सीटबेल्ट न लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram