Mumbai Fire : मुंबईत लालबागमध्ये 60 मजली इमारतीला भीषण आग, फायर ऑडिटवर पुन्हा प्रश्नचिन्ह
Continues below advertisement
मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क या टोलेजंग इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. 60 मजल्यांच्या या इमारतीच्या 17 ते 25 या मजल्यांवर आग पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती 21व्या मजल्यावरून खाली कोसळला तर दोन जण अडकल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार या निवासी इमारतीत 19 व्या मजल्यावर रिनोव्हेशनचं काम सुरू होतं. त्यावेळी ही आग लागली आणि त्यानंतर ही आग इतर मजल्यांवर पसरली.
Continues below advertisement