Mumbai : बनावट लसीनंतर आता कोरोना लसीच्या प्रमाणपत्रात घोटाळा? लसीविना प्रमाणपत्र, तरुणाचा आरोप
Continues below advertisement
मुंबईमध्ये कोरोनाच्या बनवट लशीचं प्रकरण समोर आल्यानंतर आता लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा घोटाळा झाल्याचाही आरोप होतोय. कांदिवलीच्या चारकोप पोलिस स्थानकात मनसे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांनी याबाबत तक्रार दिली आहे. निलेश मिस्त्री नावाच्या एका व्यक्तीनं कोविन अॅपवर पेड लसीकरणासाठी नोंदणी केली त्यांना एका रुग्णालयात लसीसाठी वेळही मिळाली. पण काही कारणास्तव त्यांना लशीसाठी जाता आलं नाही. मात्र त्यानंतर पुन्हा लशीसाठी नोंदणी करताना अॅपवर त्यांची पहिली लस झाल्याचं प्रमाणपत्र त्यांना मिळालं. त्यानंतर निलेश यांनी दिनेश साळवी यांच्या मदतीनं पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस याविषयी अधिक तपास करतायत
Continues below advertisement