Eknath Khadse | एकनाथ खडसे यांची आज चौकशी, ईडी कार्यालयाला छावणीचं स्वरुप
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीनं याआधी 30 डिसेंबर रोजी एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केलं होतं. पण कोरोनाची बाधा झाल्यामुळे एकनाथ खडसे त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.