Aryan Khan : आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच ; वकील म्हणतात... ABP Majha
मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या जामीन प्रकरणावर आजची सुनावणी संपली आहे. न्यायालयाचे कामकाज संपल्याने या प्रकरणाची सुनावणी आता उद्यावर ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान या प्रकरणातील मनिष राजेगरिया यांनी जामीन मंजूर झाला आहे.
आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिाकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले.त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही. अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडलं असा युक्तीवाद आर्यन खानचे वकील माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केला.
दरम्यान आर्यनच्या जामिनाला एनसीबीचा विरोध केला होता. गुणवत्तेच्या आधारावर आर्यनच्या जामिनाची याचिका फेटाळून लावण्याची एनसीबीच्या वकिलांनी मागणी केली होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन दिल्यास खटल्यावर थेट परिणाम होईल असा दावा एनसीबीच्या वतीनं करण्यात आला होता. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल फुटला आहे, त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयानं दखल घेऊ नये अशी विनंती एनसीबीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती.