NCB Letter : बेनामी पत्रातल्या आरोपांची चौकशी करण्याची नवाब मलिक मागणी, NCB मुख्यालयाला पाठवलं पत्र

Mumbai Cruise Case Nawab Malik : एनसीबी कारवाईप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणखी एक गौप्यस्फोट करणार आहेत. एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून एक पत्र मिळाल्याचा नवाब मलिक यांनी दावा केला आहे. पत्राचा फोटोही नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. या पत्रातील माहिती लवकरच ट्विटरद्वारे समोर आणणार असल्याचं नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितलं आहे. पत्राबाबतचं ट्विट करण्यापूर्वी नवाब मलिक यांनी आणखी ट्वीट करत लवकरच स्पेशल 26 ची घोषणा करणार असल्याचा इशारा दिला होता. नवाब मलिक यांच्या या दोन ट्विटमुळे आज ते कोणती मोठी घोषणा करणार याची उत्सुकता लागली आहे. नवाब मलिक यांनी वारंवार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola