Mumbai Drugs Connection to Kolhapur : मुंबईतलं ड्रग्जचं कनेक्शन थेट कोल्हापूरच्या ढोलगरवाडीपर्यंत
मुंबईतलं ड्रग्जचं कनेक्शन थेट कोल्हापूरच्या ग्रामीण भागापर्यंत आढळलं आहे. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत गेले दोन दिवसांपासून मुंबई क्राईम ब्रँचचा तपास सुरू आहे. मुंबईतून गावात आलेल्या व्यक्तीनं शेतातल्या शेडमध्ये अंमली पदार्थ लपवून ठेवल्याचं समोर आलंय. या संपूर्ण तपासाबाबत क्राईम ब्रँचनं कमालीची गुप्तता बाळगलेली आहे.