MNS March against Inflated Power Bills | वीज बिल भरु नका, पत्रातून राज ठाकरेंचं महाराष्ट्राला आवाहन
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होतील असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. वीज बिल भरु नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राला केलं आहे, असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.