Lockdown | धनगर समाजानेही धरली गावाची वाट, शेळ्या-मेंढ्यांची उपासमार होऊ नये यासाठी स्थलांतर
लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसांची उपासमार तर होतच आहे. त्याचबरोबर प्राण्यांची उपासमार सुद्धा होत आहे. ज्यांच्या जीवावर आपली उपजीविका चालते, आपला संसार चालतो, त्या शेळ्या-मेंढ्यांचे उपासमार होऊ नये यासाठी राज्यातील धनगर समाज ही स्थलांतरित होत आहे. मुंबई हून तीन महिला चार घोड्यांच्या पाठीवर आपला संसार बांधून तुळजापूरच्या दिशेने आपला जीव वाचवण्यासाठी जात आहेत. या घोड्यांच्या पाठीवर त्यांनी संसार तर बांधलेला आहेच , मात्र त्यांच्या शेळ्यांची छोटी पिल्लंही त्यांनी घोड्यांवर बांधलेली आहेत. भर उन्हात महामार्गाचे चटके सोसत या महिला चालत तुळजापूरच्या दिशेने जात आहेत. या महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेत या महिलांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.