Lockdown | पिंपरी चिंचवडमधील उद्योगांना परवानगी, 33 टक्के कामगारांच्या उपस्थितीची अट
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगधंदे सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. राज्य सरकारने तसा अध्यादेश काढला आहे. कंटेन्मेंट झोन वगळून इतर कंपन्यांचा यात समावेश असेल. त्यानुसार महापालिका प्रशासन नियमावली तयार करणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात प्रत्यक्षात कंपन्यांमध्ये कामाची सुरुवात होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील परवानगी मिळालेल्या उद्योग, औद्योगिक आस्थापनांनी 33 टक्के कामगारांच्या उपस्थितीची अट पाळणे बंधनकारक आहे. हे सर्व कामगार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राहणारे असावेत, त्यांच्या प्रवासासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे किंवा ते आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करु शकतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Continues below advertisement