Sachin Vaze यांचे खरे मालक महाविकास आघाडीतील नेतेच, Devendra Fadnavis यांचा गंभीर आरोप

Sachin Vaze यांचे खरे मालक महाविकास आघाडीतील नेतेच, Devendra Fadnavis यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्राची बदनामी सचिन वाझे प्रकरणामुळे सर्वात जास्त झाली. वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की तो NIAला काय सांगेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. नागपुरात बोलताना फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक का बरं  चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल. वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की तो एनआयएला काय सांगेल. त्यामुळे काँग्रेससह हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेंचे हे खरे मालक आहेत. यांनी वाझेंकडून काय काय कामे करून घेतली म्हणून आता शंका कुशंका काढत आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला. 

फडणवीस म्हणाले की, हा रिपोर्ट नवाब मलिकांनी फोडला. माझा सवाल हा आहे की पोलिसांची बदनामी कुणी केली? सिंडिकेट राज कुणी चालवले? दलाली कुणी खाल्ली?  बदल्या कुणी केल्या, वाझेची सेवा ज्यांनी घेतली त्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली की नाव केले? असा सवालही त्यांनी केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola