Cruise Drugs Case : आर्यन खानच्या जामिनावर थोड्याच वेळात निर्णय; 17 दिवसांपासून अटकेत, सुटका होणार?

Continues below advertisement

Cruise Drugs Case : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टानं गेल्या सुनावणीत जामीन अर्जावरील निर्णय सुरक्षित ठेवला होता. 

एनसीबीनं 14 ऑक्टोबर रोजी विशेष एनडीपीए कोर्टाक बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध करत दावा केला आहे की, आर्यन मादक पदार्थांचं सेवन करतो. मुंबईतील क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन खान गेल्या 17 दिवसांपासून अटकेत आहे. तसेच त्याच्याकडून कारवाई दरम्यान, ड्रग्सही जप्त करण्यात आले होते. 

आर्यन खान काही वर्षांपासून ड्रग्स घेतो : अनिल सिंह 

एनसीबीनं त्यांना तीन ऑक्टोबर रोजी अटक केली होती. नार्कोटिक्स ड्रग्स अॅन्ड सायकॉट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट (एनडीपीएस) प्रकरणी विशेष न्यायाधीश व्हीव्ही पाटील यांच्या न्यायालयात आर्यन खान आणि दोन इतर आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. एनसीबीला आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (एएसजी) अनिल सिंह यांनी दावा केला की, असे पुरावे आहेत की, जे दाखवताच आर्यन खान काही वर्षांपासून अमंली पदार्थांचं सेवन करत होता, हे स्पष्ट होईल.  

कधी झाली अटक?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram