Mumbai Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय,म्हणून पोटच्या मुलीची हत्या करुन नंतर स्वत:ला संपवलं
Continues below advertisement
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून एका बापानं ११ वर्षांच्या मुलीची हत्या केली, आणि मग स्वतःचं जीवन संपवलं. मुंबईच्या लालबाग परिसरातली ही घटना आहे. भुपेश पवार असं मृत बापाचं नाव आहे. त्याला नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असायचा. मंगळवारी पत्नी बाहेर गेली असता, भुपेशनं आपल्या ११ वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली, आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. स्वतःचा जीवन संपवण्याआधी भूपेशनं ९ ते १० तोळे सोनं आणि ९ लाख रुपये कॅश काढून ठेवली होती. सोनं आणि पैसे माझ्या भाच्याला द्या, अशी सुसाईट नोटही त्यानं लिहून ठेवली होती.
Continues below advertisement